राजकीय

तिसऱ्यांदा PM होताच मोदींची मोठी भेट

सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या एका दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आज मोदींनी किसान सन्मान निधीचा हप्ता जारी करण्यासंदर्भातील फाइलवर स्वाक्षरी केली आहे.
पंतप्रधान किसान निधीचा 17 वा हप्ता जारी करण्यासाठी मोदींनी तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या फाइलवर स्वाक्षरी केली आहे. याचा फायदा 9.3 कोटी शेतकऱ्यांना होणार असून अंदाजे 20 हजार कोटी रुपये वितरित केले जाणार आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिली कॅबिनेट बैठकही आज होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही सरकार काही मोठे निर्णय घेऊ शकते, असा अंदाज आहे. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी सरकार सर्व मंत्र्यांना मंत्रिपदाचे वाटप करू शकते.
किसान सन्मान निधीच्या फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर मोदींनी, मी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. आम्हाला शेतकऱ्यांच्या हितासाठी जास्तीत जास्त काम करायचे आहे. आमचे सरकार यासाठी सातत्याने काम करत आले असून, यापुढेही करत राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Related Articles

Back to top button