मनोरंजन

बॉलिवूड अभिनेत्रीने संपवले स्वत:चे आयुष्य

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीने मुंबईतील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. पोलिसांना तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. अभिनेत्री काजोलच्या ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणाऱ्या नूर मालाबिकाने इतके टोकाचे पाऊल का उचलले, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तिच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.
नूरने ६ जून रोजी मुंबईतील लोखंडवाला येथील राहत्या घरात आत्महत्या केली. ती केवळ ३७ वर्षांची होती. पोलीस याप्रकरणी चौकशी करत असून नूरने आत्महत्या का केली? या मागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
नूरच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घराचा दरवाजा तोडून नूरच्या घरात गेले, तेव्हा त्यांना तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळला. मुंबईतील बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या ममदानी हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्टने नूरवर अंत्यसंस्कार केले.

नूरचा मित्र आलोकनाथ पाठकने सांगितले की, मला ही माहिती मिळाल्यानंतर धक्का बसला. नूरला मी अनेक वर्षांपासून ओळखत होतो. आम्ही अनेक मालिका आणि सिनेमात एकत्र काम केले होते. तिची फॅमिली मागील आठवड्यात मुंबईत आली होती. नूर अनेक दिवस डिप्रेशनमध्ये होती, असे त्याने सांगितले.

Related Articles

Back to top button