महाराष्ट्र

…तर काँग्रेसच्या उमेदवारांना पाडू

मराठा नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आज जरांगे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाविरोधात बोलला तर आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना पाडणार, असे जरांगेंनी म्हंटले आहे.
काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांनी आज अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांची भेट घेतली. या भेटीवर जरांगे म्हणाले, ते कशासाठी आले होते, मला माहीत नाही. काँग्रेसने मराठ्यांची मते घेतली, निवडून आले. तर आमच्या विरोधात वडेट्टीवार बोलतात. त्याबद्दल मी काळे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.
मराठा आरक्षणाविरोधात बोलल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना पाडणार आहे. एकीकडून मराठा समाजाची मते घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने मराठ्यांच्या विरोधात बोलायचे पुन्हा असे केले तर विधानसभेला सगळा उलटफेर करू, असेही जरांगे म्हणाले.

Related Articles

Back to top button