क्राईम

पुणे कार अपघात प्रकरणी कोर्टाने फास आवळला

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला पुणे सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अग्रवालसह अन्य तिघांनादेखील न्यायालयाने 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

विशालला चौकशीसाठी पुणे पोलिसांकडून सात दिवासांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ती अमान्य करत विशालसह अन्य तीन आरोपींना 24 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यावेळी कोर्टात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवार करण्यात आला. यावेळी पोलिसांनी विशाल यांनी विना नंबर प्लेट गाडी का चालवायला दिली? मुलाला खर्च करण्यासाठी पॉकिट मनी कुठल्या स्वरूपात दिला? गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल हे फरार का झाले? यासह छ. संभाजी नगरमध्ये आढळून आले, तेव्हा त्यांच्याकडे एक साधा मोबाईल मिळून आला. बाकीचे त्यांचे मोबाईल कुठे आहेत? या सर्व गोष्टींचा तपास करणे आवश्यक आहे, असा युक्तीवाद कोर्टात केला.

Related Articles

Back to top button