क्राईम

ब्रेकिंग! पुण्यातील अपघाताचे राजकारण

पुण्यातील कल्याणीनगर भागात एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने तरुण-तरुणीला कारने चिरडल्याची घटना घडली. त्यावरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला चांगलच धारेवर धरले. यासंदर्भात राहुल यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर केला. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल यांना सुनावले आहे.

पुणे अपघात प्रकरणी राहुल यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओवर बोलताना फडणवीस म्हणाले की, पुण्याच्या घटनेत पोलिसांनी योग्य कारवाई केली. मात्र न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे मुलाला जामीन मिळाला. त्यावर आम्हीदेखील आश्चर्च व्यक्त केले आहे. तसेच हे प्रकरण पुन्हा अपील करून पोलिसांनी ही बाल हक्क न्यायालया समोर आणले आहे. मात्र अशा प्रकारच्या घटनांचे केवळ राजकारणासाठी वापर करणे हे राहुल यांना शोभत नाही. प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातून पाहणे योग्य नाही. त्यांनी या घटनेची नीट माहिती घेतली असती. तर त्यांनी अशा प्रकारचा व्हिडिओ ट्विट केला नसता, असे म्हणत फडणवीसांनी राहुल यांना चांगलेच सुनावले आहे.
दरम्यान देशातील ट्रकचालक, बसचालक, ओला, उबर, रिक्षाचालकांनी कोणाला ठार मारले तर त्यांना दहा वर्षांची शिक्षा होते, पण श्रीमंत घरातल्या अल्पवयीन मुलगा दारु पिऊन गाडी चालवत असेल आणि दोन जणांचा जीव घेत असेल तर त्याला निबंध लिहिण्यास सांगत आहेत. तर मग ट्रकचालक, रिक्षा चालकांकडून निबंध का लिहून घेत नाहीत? असा सवाल राहुल यांनी केला होता.

Related Articles

Back to top button