वडिलांनी चाळीस वर्षांत काहीही केले नाही, आता त्यांची लेक काय करणार?
सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी दिसत आहे. विविध राजकीय पक्षांकडून प्रचारांना वेग आला आहे. आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत. परिणामी निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आता मंगळवारी मतदान होणार आहे. दरम्यान, सोलापूर मतदारसंघाची निवडणुक चुरशीची होत आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या प्रणिती यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई मानली जात आहे.
या निवडणुकीत भाजपाने आमदार राम सातपुते यांना मैदानात उतवरुन प्रणिती शिदेंसमोर कडवे आव्हान उभे केले आहे.
निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज प्रणिती यांच्या विरोधात त्यांचे नाव न घेता एका अपक्ष उमेदवाराने शहरात बॅनरबाजी केली आहे. अपक्ष उमेदवार सचिन म्हस्के यांनी सोलापुरच्या विविध चौकात शिंदेंच्या विरोधात लावलेले फलक लक्ष वेधून घेत आहेत. वडिलांनी मागच्या चाळीस वर्षात सोलापूरसाठी काहीही केले नाही, आता त्यांची लेक काय करणार.?, अशा आशयाचे बॅनर्स झळकले आहेत.