राहुल गांधीकडे घरही नाही, कारसुद्धा नाही

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी दिसत आहे. विविध राजकीय पक्षांकडून प्रचारांना वेग आला आहे. आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत. परिणामी निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आता मंगळवारी मतदान होणार आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि सपासाठी प्रतिष्ठेच्या जागा ठरलेल्या अमेठी, रायबरेली आणि कैसरगंजमधून जाहीर झालेल्या उमेदवारांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. रायबरेलीमधून काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी आणि भाजपचे दिनेश प्रताप सिंग यांनी अर्ज दाखल केले.
निवडणूक आयोगाच्या नियमांमुळे प्रत्येकाने आपल्या मालमत्ता आणि गुन्ह्यांची संपूर्ण माहिती प्रतिज्ञापत्रासह दाखल केली. लोकसभेच्या उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, राहुल गांधी यांच्याकडे कोट्यवधी रुपये असल्याचे स्पष्ट होते. त्यांनी शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि गोल्ड बॉण्ड्समध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. पण त्यांच्याकडे स्वत:चे घर किंवा वाहन नाही.
रायबरेली मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार राहुल गांधी यांच्याकडे कोणतेही वाहन नाही. त्यांच्या बँक खात्यात 2625157 रुपये जमा आहेत. त्यांना दागिन्यांचाही शौक आहे. त्यांच्याकडे 4,20,850 रुपये किमतीचे सोने आणि 15,21,740 रुपयांचे सोन्याचे रोखे आहेत. त्यांच्याकडे 3,81,33,572 रुपयांचे म्युच्युअल फंड आहेत.