महाराष्ट्र

अजितदादा गटाला खुशखबर!

  1. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी दिसत आहे. विविध राजकीय पक्षांकडून प्रचारांना वेग आला आहे. आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत. परिणामी निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आता मंगळवारी मतदान होणार आहे. दरम्यान, कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांना तगडा झटका बसला आहे. रोहित यांचे कट्टर समर्थक आणि अहिल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे यांनी अजितदादा पवार गटात प्रवेश केला.
    आमदार रोहित पवार हे लोकसभेच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. राज्यभर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रचारार्थ पवार यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. अशातच पवार यांना कर्जत जामखेडमध्ये मोठा धक्का बसला आहे.
    पवार यांचे कट्टर समर्थक आणि अहिल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईमध्ये अजितदादा यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शिंदे सुरुवातीपासूनच पवार यांच्याबरोबर सक्रिय राजकारणात कार्यरत होते. मात्र काही दिवसांपासून पवार आणि शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर आता त्यांनी अजितदादांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे

Related Articles

Back to top button