राजकीय
ब्रेकिंग! ठाकरेंवर मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी दिसत आहे. विविध राजकीय पक्षांकडून प्रचारांना वेग आला आहे. आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत. परिणामी निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आता मंगळवारी मतदान होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, पण त्या प्रत्यक्ष कृतीत आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दलची आस्था कमी होताना पाहायला मिळत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी निशाणा साधला. तसेच लोक मनमोहन सिंग यांची दहा वर्ष आणि मोदींची दहा वर्ष याची तुलना करतात, असेही वक्तव्य पवार यांनी केले. पवार यांनी आज मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला.
दरम्यान, उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत. ते जेव्हा अडचणीत येतील, तेव्हा त्यांच्या मदतीसाठी धावणारा मी पहिला व्यक्ती असेन, असे मोदी यांनी अलीकडे म्हटले होते. यावर पवारांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. मोदींनी लाख काहीही म्हटले असले तरी आमची प्रार्थना आहे की, उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये.