राजकीय

ब्रेकिंग! प्रकाश आंबेडकरांना धक्का

राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. सुरूवातीला सांगलीतून ओबीसी बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगेंना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी शेंडगेंचा पाठिबा काढून घेतला होता. दरम्यान, आता प्रकाश आंबेडकरांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी शेडगेंना पाठिंबा जाहीर करत प्रकाश आंबेडकरांना धक्का दिला.
काँग्रेसविरोधात बंडखोरी करून लोकसभेच्यचा रिंगणात उतरलेल्या विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे सांगलीत आता बहुरंगी लढत होत असली तरी खरी लढत महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष अशी तिरंगी होत आहे. पाटील यांच्या अपक्ष उमेदावारीमुळं मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात असतांनाच प्रकाश आंबेडकरांनी विशाल पाटील यांची ताकद वाढवली आहे. 
वंचित बहुजन आघाडीने सांगली लोकसभा मतदारसंघातून प्रकाश शेंडगे यांचा पाठिंबा काढून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला. विशाल पाटील अपक्ष राहिल्यास पाठिंबा जाहीर करू, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले होते, त्यानुसार त्यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.
आता प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा दिला आहे. एकीकडे वंचित बहुजन आघाडी अमरावतीत आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा देत आहे, तर आता आनंदराज आंबेडकरांनी ओबीसी बहुजन पक्षाचे प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा देत आहेत.

Related Articles

Back to top button