सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी नाही

सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था चोखपणे ठेवावी. सर्व संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त व्यवस्थित ठेवावा. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या सर्व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या प्रशिक्षणाची उजळणी व्यवस्थित  करून निवडणुका निष्पक्ष, निर्भय व शांततामय वातावरणात यशस्वीपणे होण्यासाठी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे आवाहन सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक मिथिलेश मिश्र व माढा लोकसभा मतदारसंघाच्या सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक रूपाली ठाकूर यांनी केले. 

नियोजन भवन येथील सभागृहात लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक मिथीलेश  मिश्र व रुपाली ठाकूर मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी तथा माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर, शहर पोलीस उपायुक्त विजय कबाडे, दिपाली काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उप जिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यासह सर्व संबंधित नोडल अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत ई व्ही एम मशीन अत्यंत संवेदनशील विषय असल्याने मतदान केंद्रावर कर्मचारी मशनरी घेऊन जाताना व्यवस्थितपणे त्याची हाताळणी करावी. कोणत्याही मतदान केंद्रावर कोणालाही मोबाईल आतमध्ये घेऊन जाता येणार नाही. मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन घेऊन जाणे ते परत स्ट्रॉंग रूम मध्ये घेऊन येण्यापर्यंतचे सर्व बारकावे पुन्हा सांगितले. मतदान केंद्राध्यक्ष यांनी दिलेल्या सूचना संबंधित नियुक्त पोलीस कर्मचाऱ्यांनी ऐकून त्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या. 

 

Related Articles

Back to top button