सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! सुनिता, पूजाने केला भयंकर कांड
सोलापूर (प्रतिनिधी) श्रीगणेश फायनान्स व संत सेवालाल निधी लिमिटेड मार्फत सोलापूरातील गुंतवणुकदार यांची फसवणुक केलेल्या संशयित आरोपींपैकी दोन महिला संशयित आरोपींना गुरुवारी दुपारी बारा वाजले सुमारास हैदराबाद रोडवरून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
या घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी योगेश नागनाथ पवार (रा.धुम्मा वस्ती) यांची जिल्हा परिषदेत जून २०२२ रोजी संशयित आरोपी शिवाजी गोपाळ जाधव यांचेशी ओळख झाली होती. फिर्यादीने पन्नास हजाराची गुंतवणूक केली. परंतु संशयित आरोपीने त्यांना निधी बँकेच्या ठेव बुकमचील ७५६ क्रमांकाच्या पावतीवर ठेव पावती दिली आणि ऑक्टोबर २०२२ पासून डिपॉझिटवर महिना ५०० रूपये प्रमाणे परतावा देण्याचा शब्द दिला. त्यानंतर फिर्यादी यांना पैशाची गरज असल्याने फिर्यादीने आरोपीस परतावा रक्कमेची मागणी केली असता, ठेव रक्कम परत न देता फिर्यादी यांची फसवणुक केली आहे. असा गुन्हा दाखल करण्यात झाला होता. या गुन्ह्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर शहर येथे सुरु आहे.
या गुन्ह्यात ७५ गुंतवणुकदार यांची ४ कोटी १६ लाख ७६ हजार फसवणुक केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी सुनिता शिवाजी जाधव, (वय-५२,रा. साफल्य नगर, सैफुल, विजापूर रोड, सोलापूर), पुजा सचिन जाधव (वय-२८,रा. साफल्य नगर, सैफुल, विजापूर रोड,सोलापूर) या गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यात स्वतःची अटक टाळण्याकरिता परागंदा झाले होते. गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीवरुन या दोन्हीं महिला संशयित आरोपी यांना फानुस हॉटेल, हैद्राबाद रोडवरुन पोलीस महिला अंमलदार यांचे मदतीने गुरुवारी दुपारच्या सुमारास ताब्यात घेऊन अटक केली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शहाजी पवार, पोलीस हवालदार काशिनाथ धारसंगे, राजेश पुणेवाले, स्नेहा किणगी, जे.एन.गुंड, परशुराम लांबतुरे यांनी केली आहे.