क्राईम

ब्रेकिंग! दीड महिन्यांपासून रेकी, रविवारचा दिवस ठरला अन्…

पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रस्थाचिन्ह निर्माण झाले होते. मात्र तरीही वनराज आंदेकर यांना ठार मारण्याचा कट आदल्या दिवशीच म्हणजे शनिवारी रचण्यात आला होता. आणि त्यानंतर रविवारी रात्री वनराज यांची  निर्घृणपणे हत्या करण्यात आली. दरम्यान पुणे पोलिसांनी वनराज यांच्यावर हल्ला करणाऱ्या 13 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यातील तीन मुले अल्पवयीन आहेत. दहा आरोपींना न्यायालयाने 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान वनराज यांच्या खुनाला कौटुंबिक वादासह टोळी युद्धाचीही किनार आहे. याशिवाय पोलिसांच्या तपासातून आणखी माहिती समोर आली आणि ती म्हणजे शनिवारी खुनाचा कट रचण्यात आला. आणि रविवारी तो पूर्णत्वास ही गेला. 
या खून प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते आणि प्रकाश कोमकर या तिघांची भूमिका महत्वाची आहे. आरोपी सोमनाथ हा काही दिवसांपूर्वी मोक्कातून जामीनावर बाहेर आला होता. त्याला आरोपी प्रकाश कॉम्पर यांनी फोन करून आंदेकर बाबत संताप व्यक्त केला होता. प्रकाश कोमकर हा वनराज यांचा बहिण संजीवनीचा दिर आहे. 
दरम्यान या घटनेनंतर सोमनाथने लगेच खुनाचा कट रचला. त्याने अनिकेतला फोन करून आणलेले पिस्तूल कोठे आहे, अशी विचारणा केली. यापूर्वी पिस्तूल चालवले आहे का हे देखील विचारले. त्यावर अनिकेतने नाही असे उत्तर दिले. त्यानंतर सोमनाथने पिस्तूल सोबतच इतर हत्यारे देखील सोबत ठेवण्यास सांगितले. 
त्यानंतर आरोपी अनिकेतने लगेच शस्त्राची आणि इतर आरोपींची जुळवाजुळव केली. दुसऱ्या दिवशी अनिकेतने नाना पेठेतील चौकात येऊन पाहणी केली. दिवसभरात वनराजबाबत माहिती जमवली. त्याच दिवशी रात्री आरोपी एकत्र जमले आणि नंतर ते सातारा रस्त्यावरील मार्केट यार्ड भागात थांबले. त्याठिकाणी एकत्रित जमवून काही वेळ घालवला. वनराज चौकात आल्याची कुणकूण लागताच ते दुचाकीने नाना पेठेत आले. त्यांनी येताच वनराजवर गोळ्या झाडत कोयत्याने सपासप वार करून त्याचा खून केला, असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी  सांगितले.

Related Articles

Back to top button