क्राईम

भरधाव तवेराच्या धडकेत तीन तरुणांच्या स्वप्नांचा चक्काचूर

  1. राज्यात अलीकडे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील वणी-पिंपळगाव रस्त्यावरील बोराळे फाट्यानजीक तवेरा कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 
  2. याबाबत मिळालेली माहिती अशी की, वणी-पिंपळगाव रस्त्यावरील बोराळे फाट्यानजीक काल रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान वणीकडून पिंपळगावकडे जाणाऱ्या मोटारसायकल क्रमांक एमएच १५ बीए २२२९ या दुचाकीस पाठीमागून येणाऱ्या तवेरा कार क्रमांक एमएच १९ एपी ९९३३ ने पाठीमागून धडक दिल्याने मोटारसायकलवरील गौरव तुकाराम पवार (२०) मंगेश रमेश हिलीम (२३) व विजय रमेश हिलीम (१६) रा. करसुळ, ता.निफाड हे गंभीर जखमी झाले
  3. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. 

Related Articles

Back to top button