राजकीय

ब्रेकिंग! नितीन गडकरींची जागा धोक्यात

लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत असून तीन टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणे बाकी आहे. नागपूर मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पहिल्या टप्प्यात पार पडली. या लोकसभेतून भाजप नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले. पण त्यांची ही जागा धोक्यात असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

वडेट्टीवार हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते असून ते पक्षाचे स्टार प्रचारक देखील आहेत. मविआचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत वडेट्टीवार यांनी हे मत व्यक्त केले आहे. भाजपाच्या बाबतीत लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. परिणामी महाविकास आघाडी राज्यामध्ये 38 पेक्षा जास्त जागा जिंकेल. त्यामुळे गडकरी यांची नागपूरची जागासुद्धा धोक्यात आली आहे, असा टोला वडेट्टीवारांनी लगावला आहे.
गडकरी हे नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पहिल्या टप्प्यातच या मतदारसंघासाठी मतदान झाले आहे. मात्र, या मतदारसंघातून नितीन गडकरी निवडून येणार नाहीत, असा दावा करत वडेट्टीवार यांनी केला आहे.

Related Articles

Back to top button