राजकीय

ब्रेकिंग! एमआयएमचे धक्कातंत्र

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. दरम्यान,  उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघ याठिकाणी काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्या नाराजी नाट्यानंतर त्यांना उमेदवारी तर, दुसरीकडे भाजपाने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडीत लढत असे जवळपास निश्चित झाले होते. मात्र आज या मतदारसंघात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एमआयएमची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीचे गणित बिघडणार का? हे पाहावे लागेल.
उत्तर मध्य मुंबईतून एमआयएमने मोठी खेळी खेळतानाच रमजान चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.

एमआयएमने ऐनवेळी आपला पत्ता उघडताना चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाची मते चौधरी यांच्याकडे वळू शकतात आणि याचा फटका काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना बसण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button