महाराष्ट्र

हत्या, राख, खंडणी, मटका…

बीडमध्ये आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली असून यावेळी मंत्री धनंजय मुंडे, भाजपा आमदार सुरेश धस आणि खासदार बजरंग सोनवणे आमने-सामने आले. बीडची बदनामी आणि अधिकाऱ्यांवर दहशत असल्याच्या आरोपांवरुन तिन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. यावेळी मुंडे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला धस, सोनवणे हे होते. बैठकीनंतर सोनवणे यांनीच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.  

डीपीडीसीच्या बैठकीत गैरव्यवहाराची सीडी, पेन ड्राईव्ह यांचा मुद्दा उपस्थित झाला का? असे विचारले असता त्यांनी नाही असे म्हटले. पुढे ते म्हणाले, पण जर कोणीला एकाला बाजूला करुन बोलले तर आम्ही पाहत राहणार नाही. दहशत कोणाची याचे उत्तर द्या, असे सांगितले. माजी पालकमंत्री म्हणाले, येथे अधिकाऱ्यावर दहशत आहे. मग कोणाची दहशत आहे विचारल्यावर त्यावर बाचाबाची झाली. यानंतर बैठक संपली. पालकमंत्री अजित पवार बैठक सोडून निघून गेल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला.

वेगवेगळ्या पद्दतीने मुद्दे माडंले असता आम्ही एका बाजूने आणि ते दुसऱ्या बाजून बोलत होते. अधिकाऱ्यावर दहशत आहे, बीडची बदनामी करु नका, असे सांगत होते. आम्ही बदनामी करतोय का? मर्डर, चोऱ्या करतोय का? आम्ही राखेचा धंदा करतोय का? आम्ही खंडणी, मटका चालवतोय का? सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्याचे काम करत आहोत. सरपंच संतोष देशमुख यांच्यासाठी न्याय मागत आहोत, ही बदनामी आहे का? यावरुन बाचाबाची झाली, अशी माहिती सोनवणे यांनी दिली.

Related Articles

Back to top button