राजकीय
काँग्रेसला मोठा झटका

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत दोन टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे. आता मतदानाचा तिसरा टप्पा सात मे रोजी आहे.
मध्य प्रदेशचे माजी मंत्री आणि सहावेळा काँग्रेसचे आमदार रामनिवास रावत यांनी शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री मोहन यादव, भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही.डी. शर्मा आणि माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या उपस्थितीत त्यांनी श्योपूर येथील जाहीर सभेत पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले.विशेष म्हणजे रावत जेव्हा भाजपमध्ये प्रवेश करत होते, त्याचवेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी शेजारच्या भिंड जिल्ह्यात निवडणूक प्रचारा दरम्यान एका सभेला संबोधित करत होते.