राजकीय
ठाकरेंना तगडा झटका?

याच निवडणुकीच्या दृष्टीने एबीपी सी-व्होटरने एक सर्व्हे केला आहे. ज्यामध्ये भाजपा आणि महायुतीला चांगले यश मिळत आहे. याचवेळी मुंबई आणि कोकणात देखील महायुतीची सरशी होत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व्हेतील धक्कादायक बाब म्हणजे शिवसेनेला रायगड वगळता एकाही जागी आघाडी मिळत नसल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
- 2014 आणि 2019 या निवडणुकीत शिवसेनेने मुंबईतील 3 जागा जिंकल्या होत्या. मात्र, आता या सर्व्हेनुसार मुंबईतील एकाही जागी ठाकरेंच्या शिवसेनेला आघाडी मिळत नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेला कोकण आणि मुंबईत एकूण पाच जागा मिळू शकतील. त्याप्रमाणेच भाजपलादेखील पाच जागा मिळतील, असेही सर्व्हेत नमूद करण्यात आले आहे.