ब्रेकींग! देशात पुन्हा मोदी मॅजिक

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात चांगलेच तापू लागले आहे. राजकीय पक्षांकडून प्रचार केला जात आहे. विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी मैदान तयार झाले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलपासून सुरू होणार असून, यासोबतच निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.
दरम्यान मतदानापूर्वी एबीपी न्यूज-सी व्होटरच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणाचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतेल, तर विरोधी इंडिया आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्वेक्षणानुसार, मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी लोकसभा निवडणुकीत मोठा विजय नोंदवू शकतो. सर्वेक्षणात एनडीएला 373 जागा मिळतील, तर विरोधी इंडिया आघाडीला 155 जागा मिळू शकतात. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड आणि ओडिशा या मोठ्या राज्यांमध्ये एनडीएला मोठी आघाडी मिळण्याची शक्यता आहे. इतर पक्षांना केवळ 15 जागांवर समाधान मानावे लागेल. एनडीएला निवडणुकीत पराभूत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या इंडिया आघाडीची झोळी या निवडणुकीत रिकामीच राहणार आहे.