महाराष्ट्र

ब्रेकिंग! ‘तसले’ पोस्ट गुन्ह्याच्या कक्षेत

महिलांच्या प्रतिष्ठेचा अपमान करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट आणि ईमेल हे गुन्ह्याच्या कक्षेत येतात, अशी महत्वपूर्ण टिप्पणी मुंबई हायकोर्टाने केली आहे. एका खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने हे महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ईमेल आणि सोशल मीडियावर महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे शब्द हे आयपीसीच्या कलम 509 अंतर्गत गुन्हा असल्याचे हायकोर्टाने अधोरेखित केले आहे.
2009 साली एका महिलेने ती दक्षिण मुंबईतील एका सोसायटीत राहत असताना एका व्यक्तीने तिच्याविरोधात आक्षेपार्ह आणि अपमानास्पद ईमेल लिहून चारित्र्यावर टिप्पणी केली होती. याबाबत संबंधित महिलेने आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीत महिलेने हा मेल समाजातील इतर लोकांनाही पाठवण्यात आल्याचे महिलेने सांगितले होते. यानंतर तक्रारदार महिलेने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, या प्रकरणावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाने सांगितले की, ईमेलमध्ये महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे शब्द निःसंशयपणे अपमानास्पद आहेत. समाजाच्या नजरेत महिलांची प्रतिमा आणि प्रतिष्ठा कमी करण्याचा या साहित्याचा उद्देश असल्याचे निरीक्षण नोंदवत महिलेची तक्रार रद्द करण्यास नकार दिला. 

Related Articles

Back to top button