राजकीय
वाद न घालता महत्त्वाचे मतदारसंघ स्वत:कडे राखण्यात यश

- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आज चौथी उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात सात उमेदवारांचा समावेश आहे. काटोलमधून अनिल देशमुख यांच्या जागी त्यांचे चिरंजीव सलील देशमुख यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तर, दौंडमध्ये रमेश थोरात यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.
- लोकसभेतील दणदणीत यशानंतर पवार हे नव्या जोमाने विधानसभा निवडणुकीच्या रणमैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडीचे जागावाटप करताना मित्रपक्षांशी कुठलाही वाद न घालता पवार यांच्या पक्षाने महत्त्वाचे मतदारसंघ स्वत:कडे राखण्यात यश मिळवले आहे. यातील बहुतेक मतदारसंघात त्यांच्या पक्षाचा अजितदादा पवारांच्या उमेदवारांशी सामना होणार आहे.
- नव्या यादीतील सात उमेदवार व त्यांचे मतदारसंघ पुढीलप्रमाणे…
- माण – प्रभाकर घार्गे
- काटोल – सलील अनिल देशमुख
- खानापूर – वैभव सदाशिव पाटील
- वाई – अरुणादेवी पिसाळ
- दौंड – रमेश थोरात
- पुसद – शरद मैंद
- सिंदखेडा – संदीप बेडसे.