राजकीय

ब्रेकिंग! भाजप आघाडी ‘अब की बार चारसौ पार’ करणार का?

लोकसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. ‘अब की बार चारसौ पार’ची घोषणा भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची आहे. यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला रोखण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत ‘इंडिया’ ही आघाडी स्थापन केली आहे. परिणामी यंदाची निवडणूक थेट होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत एका सर्वेक्षणाचे निष्कर्ष समोर आले असून त्यातून चारशेहून अधिक जागा जिंकण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण होईल का, याचा अंदाज बांधण्यात आला आहे.
टाइम्स नाऊ ईटीजीने लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या सर्वेक्षणाद्वारे आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आले आहेत. आगामी निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा एकदा सत्तेत येईल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 2019 च्या तुलनेत सत्ताधारी रालोआच्या जागा वाढतील, असा अंदाज आहे.
या सर्व्हेमध्ये सत्ताधारी रालोआ आघाडीला सुमारे चारशे जागा देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला शंभरहून अधिक जागा दाखविण्यात आल्या आहेत. या दोन आघाड्यांशिवाय वायएसआर काँग्रेस पक्षाला 21-22 जागा मिळतील. नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाला 10-11 जागा मिळण्याची शक्यता आहे. 11-15 जागा इतर पक्ष आणि अपक्ष आमदारांना मिळू शकतात, असा सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे.

Related Articles

Back to top button