सोलापूर

खुशखबर | मित्रांनो, आता विसरा पेट्रोलला

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे वाहनचालकांचा खर्च दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे अनेक जण आता पेट्रोल आणि डिझेलऐवजी सीएनजी गाडीचा पर्याय निवडत आहेत. आता भारतीय बाजारात इलेक्ट्रिक बाईकनंतर सीएनजी बाईक येणार आहे. सीएनजी वाहन खरेदी करण्याकडे कल आता वाढू लागला.

अनेक जण सीएनजीवर चालणारी वाहने घेण्यास प्राधान्य देत आहेत. आता सीएनजीवर चालणारी बाईकही बाजारात येत आहे. सीएनजीवर चालणारी जगातली पहिली बाईक बजाज ऑटो लाँच करणार आहे. ही बाइक 2025 मध्ये लाँच होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती; पण आता कंपनी लवकरच ती लाँच करण्याची तयारी करत आहे.
बजाज कंपनीने या बाईकचे डिझाइन कसे असेल, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही; पण बजाज कंपनीच्या मते, या बाईकमध्ये सीएनजी टेक्नॉलॉजी अधिक सुरक्षित पद्धतीने वापरण्यात आली आहे. बाईकच्या इंजिनची क्षमता किती असेल, हे कंपनीने अद्याप स्पष्ट केले नाही; पण भविष्यात एकापेक्षा जास्त सीएनजी बाइक कंपनीकडून आणल्या जाऊ शकतात. ही सीएनजी बाइक 100 सीसी ते 160 सीसीच्या दरम्यान असू शकते. या बाईकद्वारे जगभरातील ग्राहकांना एक किफायतशीर आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून दिला जाईल, असेही कंपनीच्यावतीने सांगण्यात आले.

Related Articles

Back to top button