राजकीय
ब्रेकिंग! भाजपकडून पहिली उमेदवारी यादी जाहीर आणि दुसरीकडे शरद पवारांचा मोठा धमाका

- आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचंड घडामोडींना वेग आला आहे. आज भाजपकडून पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. तर दुसरीकडे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षात मोठी घडामोड पाहायला मिळाली. दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी तथा शिवसंग्राम संघटनेच्या नेत्या ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना बीडमधून विधानसभेची तिकीट मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
- विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम संघटनेची जबाबदारी ज्योती मेटे सांभाळत होत्या. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देखील त्यांची निवड करण्यात आलेली होती. लोकसभेपासून त्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत होत्या. आता देखील त्यांनी विधानसभेसाठी चाचपणी सुरू केली होती, मात्र अचानक ज्योती मेटे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ज्योती मेटे यांच्यासह सलीम पटेल बाळासाहेब खोसे यांनी देखील पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.