ब्रेकिंग! कुछ तो गडबड है, हा जनतेचा कौल वाटत नाही

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन तासांचे कल हाती आले असून निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटनुसार भाजप हा मोठा पक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे. महायुती 200 पार गेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष मिळून 60 पारही जाऊ शकलेले नाही. उलट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 58 उमेदवार आघाडीवर आहेत.
पण आलेल्या या कलांवर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे. महायुतीने संपूर्ण यंत्रणा विकत घेतली असून या निकालांमध्ये काही तरी गडबड करण्यात आली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच मोदी, शहा, अदानी यांनी हा निकाल ठरवून लावला असल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे. आत्तापर्यंतच्या निकालात कुछ तो गडबड है. हा जनतेचा कौल वाटत नाही. शिंदेंचे सर्व आमदार कसे निवडून येतात ? असा सवालही त्यांनी विचारला आहे.



