राजकीय

ब्रेकिंग! मोदींना हलक्यात घेणे काँग्रेसला पडतंय महाग

  1. आगामी लोकसभा निवडणुकीला आता अवघे काहीच दिवस उरले आहेत. त्याआधी देशाचा नेमका मूड काय आहे हे इंडिया टुडे आणि मुंबई Tak ने मूड ऑफ द नेशन या सर्व्हेच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. याच सर्व्हेमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उत्तर भारतात लाट असल्याचे दिसून येत आहे.
    काही महिन्यांपूर्वीच राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या उत्तरेकडील राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत जे निकाल होते, ते अत्यंत अनपेक्षित असे होते. त्यातही मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला यश मिळेल, अशी आशा होती. मात्र, तसे अजिबात घडले नाही.
    लोकसभेची निवडणुकीत फक्त मुद्दे नाही तर नेते, चेहरा या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. ज्या पद्धतीने इंडिया आघाडीची पहिली बैठक झाली आणि त्यानंतर भाजपाने जी पावले उचलली. त्यानंतर भाजपाने समविचारी मतांमध्ये विभाजन कसे होईल, याची काळजी घेतली. यावेळी भाजपाने एक साधी आणि सरळ अशी रणनिती आखल्याचे दिसून येत आहे. ज्यानुसार काँग्रेसला एकटे पाडून त्यांनी एकट्याने लोकसभेची निवडणूक लढवावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे.
    निवडणुकीच्या बाबतीत काँग्रेसचा काहीसा ढिलेपणा ही त्यांची सर्वात मोठी कमकुवत बाजू दिसून येत आहे.  225 जागा या उत्तरेत आहेत. त्यापैकी 185 जागा या भाजपाने जिंकल्या आहेत. त्यामुळे या पट्ट्यातील जागा वाढविण्यावर पंतप्रधान मोदी आणि भाजपाचा प्रयत्न असणार आहे.

Related Articles

Back to top button