राजकीय
ब्रेकिंग! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष निवडणूक आयोगाने अजितदादा पवार यांच्या गटाला दिल्यानंतर आता शरद पवार गटाला नवे नाव दिले आहे. ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असे नाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार यांच्या गटानं मूळ पक्षावर व पक्षाच्या चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगाकडे यावर सुनावणी होऊन आयोगाने अजितदादा यांच्या बाजूने निकाल दिला होता.
तसेच राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने नवीन नावासाठी पर्याय सुचवावेत, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, शरद पवार गटाने तीन पर्याय सुचवले होते. त्यातील ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ हे नाव निवडणूक आयोगाने मान्य केले आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीला ठोस नावानिशी सामोरे जाण्याचा मार्ग त्यांचा मोकळा झाला आहे.