आरोग्य

खुशखबर! आयुष्मान भारत योजनेबाबत मोठी अपडेट

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयुष्मान भारत योजनेबाबत अनेक घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सीतारमण म्हणाल्या की, आयुष्मान योजनेची व्याप्ती आता वाढवण्यात आली आहे. त्यानंतर आता सर्व आशा, अंगणवाडी सेविका आणि सहाय्यकांनाही आयुष्मान भारत योजनेंतर्गत आरोग्य संरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयांच्या सेवा वाढविणे, अंगणवाडी केंद्रांचे दर्जान्नीकरण तसेच लसीकरणाबाबत अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. आयुष्मान भारत योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. याला आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असेही म्हणतात. देशातील गरीब किंवा कमी उत्पन्न असलेल्या दहा कोटी कुटुंबांना आरोग्य सेवा पुरवणे हा या योजनेचा उद्देश आहे. या आरोग्य विमा योजनेद्वारे प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांचे संरक्षण दिले जाते. दहा कोटी कुटुंबांपैकी आठ कोटी कुटुंबे ग्रामीण भागातील आहेत आणि 2.33 कोटी कुटुंबे शहरी भागातील आहेत. याचा अर्थ ५० कोटी लोकांना वैयक्तिकरित्या लाभ मिळवून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

Related Articles

Back to top button