देश - विदेश

ब्रेकिंग! पाचशे वर्षांची प्रतिक्षा संपली

अयोध्येतील भव्य राम मंदिराचे आज थाटामाटात लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी जय श्रीरामाच्या घोषणांनी अयोध्यानगरी दुमदुमून गेली होती. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती होती.
परदेशात विविध ठिकाणी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद व्यक्त केला जात आहे. अनेक भारतीय विदेशात हा जल्लोष साजरा करत आहेत. समाज माध्यमांवर याचे व्हिडिओ समोर आले आहेत. परदेशातही रामनामाचा गजर होत आहे. राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे उत्साहात सेलिब्रेशन पार पडले.
‘जय श्री राम’ची धून केवळ भारतातच नाही तर जगाच्या अनेक भागांतून ऐकू येत आहे. युनायटेड स्टेट्समधील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राम मंदिराचा अभिषेक समारंभाच्या आधी भव्य उत्सव साजरा झाला. गोल्डन सिटीमधील भारतीय नागरिकांनी मोठी रॅली काढली होती.

Related Articles

Back to top button