क्राईम
ब्रेकिंग! रामध्वज असलेल्या वाहनांवर हल्ला

- राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणेनिमित्त सोलापुरात उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्यानिमित्त देशातील हिंदू प्रथमच एकवटले आहेत. दरम्यान, या पूर्वसंध्येला मुंबईतील मीरा रोडमध्ये रामध्वज असलेल्या वाहनांवर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
अयोध्यातील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी व्हायरल झालेल्या या घटनेच्या व्हिडिओमध्ये रामध्वज असलेल्या वाहनांवर हल्ला होत आहे. हल्लेखोरांनी काचा फोडून शिवीगाळ केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
हिंदू समुदायाचे लोक तीन- चार कारमधून जात असताना जय श्री राम अशा घोषणा देत होते. त्यावेळी मुस्लीम समाजातील काही लोकांनी त्यांच्याशी वाद घातला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांची गाडी तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि काही लोकांना ताब्यात घेतले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली असून परिसरात फ्लॅग मार्च काढण्यात आला.