महाराष्ट्र
ब्रेकिंग! पुण्यात जीबीएसचा दुसरा मृत्यू

पुण्यासह राज्यभरात नव्या सिंड्रोमने थैमान घातले आहे. पुण्यासह नागपूर, सोलापूर, कोल्हापूरातही जीबीएसने शिरकाव केला आहे. आता सिंड्रोमबाबत नवी माहिती समोर आली आहे.
आज पुण्यात नवीन १६ जीबीएस रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे पुण्यामध्ये जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या १२७ वर गेली आहे.
पुणे शहरात जीबीएस सिंड्रोममुळे पहिला मृत्यू झाला होता. मृत महिला कॅन्सरग्रस्त होती. १५ जानेवारी रोजी ससून रुग्णालयात करण्यात आले होते. जीबीएसमुळे पुणे विभागातला हा दुसरा मृत्यू आहे. सिंहगड रोड परिसरात राहत असलेली ही महिला ५६ वर्षांची होती. याआधी एका रुग्णाचा जीव जीबीएसमुळे गेला. दरम्यान आता सांगलीतदेखील गुइलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव झाला आहे.