राजकीय

एकदा होऊनच जाऊ द्या

काही दिवसांपूर्वीच बिहारमधील नितीश कुमार सरकारने जातनिहाय जनगणना केली होती. ज्यानंतरग भाजपाने त्यांच्यावर कडवट टीका केली होती. दरम्यान आता भाजपासोबत सत्तेत असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीच मोदी सरकारकडे जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. परिणामी सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे.

बिहारप्रमाणेच एकदा जातनिहाय जनगणना होणे गरजेचे असून 2011 नंतर 2021 साली ही जनगणना होणे आवश्यक होते. मात्र, ती झाली नाही. त्यामुळे आता जातनिहाय जनगणना केल्यास कोणाची किती लोकसंख्या हे चित्र स्पष्ट होईल आणि अर्थसंकल्पात त्या-त्या जातींना त्याप्रमाणे योजना देता येतील, असे अजितदादा यांनी स्पष्टपणे सांगितले.
सध्या राज्यात 52 टक्के सर्व मागास आणि इतर मागास जातींसाठी आरक्षण आहे. यानंतर पुन्हा दहा टक्के आर्थिक मागास समाजासाठी आरक्षण देण्यात आले आहे. याचा फायदाही मराठा समाजाला होत असून याचीही आकडेवारी काढण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. आता दिलेल्या 62 टक्के आरक्षण सोडून उरलेल्या 38 टक्के आरक्षणात मराठा समाजाला बसवून आरक्षण देण्यासाठी घटनातज्ज्ञ अभ्यास करत आहेत, असे अजितदादा यांनी सांगितले.
एकूणच अजितदादा यांनी जातनिहाय जनगणनेचा प्रचंड आग्रह धरला आहे. एकदा जातनिहाय जनगणना होऊनच जाऊद्या , नेमकी आकडेवारी समोर येईल, असेही अजितदादा यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button