सोलापूर
खुशखबर! सोलापुरात दिवाळी शॉपिंग उत्सव
श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळाच्या महिला विभागातर्फे २६ व २७ ऑक्टोबर रोजी दिवाळी शॉपिंग उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्षा पारुल पटेल यांनी दिली. गुरुवार दि. २६ रोजी सकाळी १० वाजता आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार असून हे प्रदर्शन दोन दिवस सकाळी १० ते रा. ८ पर्यंत गुजरात भवनच्या वातानुकूलित सभागृहात चालणार आहे.
ह्या प्रदर्शनात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर साड्या , ड्रेस मटेरियल, ड्रेसेस, इमिटेशन ज्वेलरी, डायमंड ज्वेलरी, सजावटीचे विविविध आयटम्स, दिवे , खाद्य पदार्थ आदींचे स्टॉल्स उभारण्यात येणार असून सोलापूरकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ह्या प्रदर्शनात दर दोन तासाला लकी ड्रा काढण्यात येणार आहे.