एकच नंबर! इस्त्रोने दिली मोठी खुशखबर

Admin
1 Min Read
इस्त्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान ३ चे यशस्वी लँडिंग करत इतिहास रचला आहे. याबद्दल संपूर्ण जगभरातून इस्त्रोचे कौतुक होत आहे. भारत जगातील पहिलाच असा देश ठरला आहे, ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरवले आहे.
त्यानंतर आता सर्वांच्या नजरा इस्त्रोच्या अन्य मोहीमांवर लागल्या आहेत. मागच्या महिन्यात इस्त्रोने देशाचे पहिले सूर्य मिशन आदित्य एल-१ ही लाँच केले होते. या यानाने आतापर्यंत ९ लाख किलोमीटरहून अधिक प्रवास केला आहे. अंतराळ क्षेत्रात नवनवीन यशाला गवसणी घालणाऱ्या इस्त्रोने आता आणखी एक खुशखबर दिली आहे. इस्त्रोने चांद्रयानच्या आगामी मिशन म्हणजे चांद्रयान-४ सह अन्य मोहीमांची माहिती दिली आहे.
इस्त्रोचे डेप्युटी संचालक पी सुनील यांनी म्हटले आहे की, पेलोडची संख्या वाढवून चंद्रयान ४,५ व ६ लाँच करण्याची तयारी सुरू आहे.
यासाठी नियोजन केले जात आहे. सुनील यांनी श्रीजगन्नाथ संस्कृत विद्यापीठाच्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, स्पेस स्टेशन लाँचिंगबाबतही नियोजन केले जात आहे. अनेक स्पेस मिशन लाँच केल्यानंतर आम्हला चांगले फंडिंग होत आहे. आता इंटरनेशनल स्पेस बिझनेस शेअर दोन टक्के जो सात बिलियन डॉलरपर्यंत पोहोचला आहे.
Share This Article