क्राईम
ब्रेकिंग! भरधाव ट्रकची स्कूटीला धडक

- अलीकडे सोलापूरसह अन्य भागात अपघाताचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान, बीडमधून एक भीषण अपघात घडला आहे. बीड -परळी महामार्गावर बाईकला भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला तर वडील जखमी झाले आहेत. स्वाती शिवनारायण गोंडे ही तरुणी वडील शिवनारायण यांच्यासोबत काही कामानिमित्त वडवणी शहरात आली होती. काम आटोपून दोघेही आपल्या स्कूटीवरुन चिंचोली गावाकडे घरी जायला निघाले.
दरम्यान बीड -परळी महामार्गावरील वडवणी शहराजवळ त्यांच्या स्कूटीला पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिली. या धडकेत स्वातीचा मृत्यू झाला तर वडील शिवनारायण हे गंभीर जखमी झाले. वडिलांच्या डोळ्यादेखत मुलीचा अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.