राजकीय
ब्रेकिंग! शिंदे गटाचे धक्कातंत्र

- शिंदे गट आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुरू असताना दुसरीकडे ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी शिंदे गटाने जबरदस्त मास्टर प्लान आखला आहे.
ठाकरे गटाच्या चार खासदारांना नोटीस पाठवण्याची तयारी शिंदे गटाने सुरू केली आहे. लवकरच या चारही खासदारांवर कारवाई केली जाणार असल्याचे कळते. अलीकडेच मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले होते. या अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्यात आले. यासाठी संसदेत मतदानही घेण्यात आले. या मतदानाच्या दिवशी मात्र ठाकरे गटाचे चार खासदार अनुपस्थित होते.
त्यांनी अद्याप यासंदर्भात कोणताही निर्णयही लोकसभा सचिवालयाला कळविला नाही. याच आता मुद्द्यावर शिंदे गटाने ठाकरे गटाच्या चार खासदारांना कोंडीत पकडण्यासाठी मोठी तयारी सुरू केली आहे. या विधेयकाला पाठिंबा न देण्याच्या कृतीवर खासदार विनायक राऊत, ओमराजे निंबाळकर, राजन विचारे आणि संजय जाधव यांना नोटीस पाठवून कारवाई केली जावी, असे शिंदे गटाने सूचित केले आहे.