देश - विदेश

देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय

मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. हे अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबरपर्यंत चालेल. सांगितले जात आहे की, या अधिवेशनात पाच बैठका होतील. सूत्रांच्या माहितीनुसार संसदेच्या या विशेष अधिवेशनात मोदी सरकार ‘एक देश-एक निवडणूक’ विधेयक आणू शकते.
एक देश एक निवडणुकीचा अर्थ आहे, देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी घेतल्या जाणार आहेत.
 देशात ‘वन नेशन-वन इलेक्शन’ वरून गेल्या अनेक वर्षापासून वाद सुरू आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात लॉ कमीशनने राजकीय पक्षांकडून सहा प्रश्नांची उत्तरे मागितली होती. एकाच निवडणुकीला अनेक पक्षांचा विरोध आहे.
संसदेच्या विशेष सत्रात यूसीसी आणि महिला आरक्षण विधेयकेही सादर केली जातील. मोदी यांनी राज्यसभेत चर्चे दरम्यान म्हटले होते की, एक देश एक निवडणुकीचा विरोध केला जात आहे, मात्र यावर चर्चा करायला तर पुढे या. जितके मोठे नेते आहेत त्यांनी म्हटले होते की, या आजारातून मुक्ती पाहिजे. पाच वर्षात एकदाच निवडणुका पाहिजेत. महिना-दोन महिने उत्सवासाठी असावीत मात्र त्यानंतर कामावर जायला हवे.

Related Articles

Back to top button