राजकीय
अजितदादा मुख्यमंत्री होणार ?

- अलीकडे अजितदादा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले. राज्य सरकारमध्ये सहभागी होताच अजितदादा यांनी थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु , त्यानंतर राज्यातील राजकारणाचा खरा अध्याय सुरू झाला. अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील, असे दावे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांकडून सतत करण्यात आले.
या दाव्यांवर जोरदार चर्चा होत असतानाच आता स्वराज्य संघटनेचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे यांनी खळबळजनक दावा केला आहे. अजितदादा हे राज्याचे मुख्यमंत्री होणार नाहीत, असा दावा छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे. संभाजीराजे मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
मी चॅलेंज देऊन सांगतो की, अजितदादा मुख्यमंत्री होणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार शरद पवारांकडे परततील. हा सर्व ठरवून झालेला प्लान आहे, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्रिपदी शिंदे हेच राहणार आहेत. अजितदादा यांना मुख्यमंत्री केले जाणार नाही. हे केवळ लोकसभा निवडणुकांसाठी जुळविलेले गणित आहे, असेही संभाजीराजे म्हणाले.



