बिजनेस

इनकमिंग कॉल व एसएमएसबाबतीत सोमवारपासून होणार बदल

मोबाइल इनकमिंग कॉल आणि एसएमएसबाबतीत महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच सोमवार एक मेपासून बदल होणार आहे.

याबाबत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणने (ट्रायने) ठोस पावले उचलली आहेत. ट्राय आता एक नवीन नियम आणत आहे. त्यानुसार एक मेपासून तुमच्या फोनमध्ये बनावट कॉलिंग व एसएमएस येऊ शकणार नाही.
ग्राहकांना नको असलेले कॉल्स् व मेसेज येणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांची डोकेदुखी थांबणार आहे. तसेच विनाकारण ग्राहकांना त्रास होणार नाही. ट्रायने याबाबत दूरसंचार कंपन्यांना सूचना दिल्या आहेत. 
एक मेपासून टेलिफोन कंपन्या बनावट कॉल्स् व एसएमएससाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस स्पॅम फिल्टर्स लागू करणार आहेत. संबंधित फिल्टर बनावट कॉल व मेसेज रोखण्याचे काम करणार आहे. परिणामी आता फेक कॉल व एसएमएस तुमच्यापर्यंत येऊ शकणार नाहीत. एअरटेलने याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे तर जिओदेखील हे फिल्टर लागू करणार आहे

Related Articles

Back to top button