सोलापूर

तवांग संघर्षानंतर भारतीय वायुसेनेचा सीमेवर युद्धसराव

तवांग सेक्टरमध्ये भारतीय आणि चीन सैन्यात झालेल्या संघर्षानंतर आता भारतीय वायुसेना गुरुवारपासून चीन सीमजवळ दोन दिवसीय युद्धाभ्यास करणार आहे. या युद्धाभ्यासादरम्यान वायुसेनेतील जवळपास सर्वच फ्रंटलाईन फायटर जेट सहभागी होणार आहेत.या युद्धाभ्यासामागचा मुख्य उद्देश चीन सीमेवरील आपल्या ऑपरेशन आणि क्षमतांचे परीक्षण करणे हा आहे.

भारतीय आणि चीन सैन्यातील संघर्षापूर्वीपासून या सरावाचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे या सरावाचा अलीकडच्या संघर्षाशी काहीही संबंध नाही. हवाई दलाचा हा सराव तेजपूर, चाबुआ, जोरहाट आणि हाशिमारा एअरबसवर होणार आहे. हवाई दलाच्या इस्टर्न कमांडकडून हा सराव करण्यात येणार आहे. ईशान्य भारताला लागून असलेल्या चीन, बांग्लादेश आणि म्यानमारच्या सीमेवर नजर ठेवली जाणार आहे.

Related Articles

Back to top button