मनोरंजन

शाहरुखचा ‘पठाण’ जेथे प्रदर्शित होईल ते थिएटरच जाळून टाका

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान, दीपिका पदुकोण यांचा पठाण हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचे प्रमोशन ठिकठिकाणी केले जात आहे. या चित्रपटातील एका गाण्यामुळे पठाण हा सिनेमा वादात अडकला आहे. नुकतेच बेशरम रंग हे गाणे रिलीज करण्यात आले. या गाण्यांमध्ये दीपिकाचा बोल्ड अंदाज दिसून येत आहे
तिचा हा लुक चाहत्यांना आवडला आहे.

मात्र या गाण्यातील तिच्या बिकिनीमुळे वाद निर्माण होत आहे. या गाण्यात तिने भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे. शिवाय हा चित्रपट ज्या सिनेमागृहात प्रदर्शित होईल ते सिनेमागृह जाळून टाका, असे आदेश अयोध्याचे महंत राजू दास यांनी दिला आहे.
सध्या बॉलीवूडमध्ये सनातन धर्माची सातत्याने खिल्ली उडवली जात आहे. पठाण या चित्रपटात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घालून भगव्या रंगाची आणि साधुसंतांचा अपमान केल्याचा आरोप दास यांनी केला आहे. दरम्यान पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट मोठ्या वादात अडकला आहे. 

Related Articles

Back to top button