आजारी काकांना भेटून निघाले मात्र…

रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशीच एक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. आपल्या आजारी काकांना घरी जाताना झालेल्या अपघातात एकाला आपले प्राण गमवावे लागले.
औरंगाबाद शहरातील मिटमिटा परिसरात कारला अपघात होऊन ही घटना घडली आहे.
कन्नड येथून त्रिंबक वाघ हे आपली पत्नी आणि आठ वर्षाच्या मुलीसह त्यांच्या काकांना भेटायला निघाले. त्यांच्या काकाची शस्त्रक्रिया झाली होती. काकांच्या तब्येतीची विचारपूस झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या मूळ गावी निघाले.
मात्र मिटमिटा परिसरात आल्यावर ओव्हरटेक करण्याच्या नादात एका कारने त्यांच्या दुचाकीला जोराने धडक दिली. यात त्र्यंबक वाघ, त्यांची पत्नी व चिमुकली जखमी झाले. यातील जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र डॉक्टरांनी त्र्यंबक वाघ यांना मृत घोषित केले. त्यांची मुलगी व पत्नी हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यांच्या बाईकचा पूर्णपणे चुराडा झाला आहे.