खेळ
ब्रेकिंग! आशिया कपमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

- आशिया कप स्पर्धेत भारताविरुद्ध झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर अजूनही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सावरलेले नाही. या मॅचनंतर बिथरलेले पाकिस्तान आशिया कपचे मैदान सोडल्याचे वृत्त आले होते. पाकिस्तान विरुद्ध यूएई यांच्यात आज होणार आहे. हा सामना रद्द झाला, असा दावा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हवाल्यानुसार करण्यात येत होता. पण, पाकिस्तानने पुन्हा घुमजाव केल्याचे वृत्त आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान विरुद्ध यूएई सामना हा एक तास उशीरा सुरु होईल.
- पाकिस्तानी माध्यमांनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना स्पर्धेतून हटवण्याची मागणी केली होती. पण, आयसीसीने ती मागणी फेटाळली. त्यानंतर नाराज झालेले पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यूएईविरुद्धचा सामना खेळणार नसल्याचा दावा पाकिस्तानच्या मीडियाने केला होता.



