खेळ

खेळपट्टीवरून आयसीसीने पाकिस्तानचे वाभाडेच काढले

  1. इंग्लंडकडून दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पाकिस्तानला मोठा झटका दिला. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना ज्या रावळपिंडी मैदानावर खेळवण्यात आला होता, त्या मैदानातील खेळपट्टीवरून आयसीसी भडकली असून ही खेळपट्टी सरासरीपेक्षा कमी असल्याचे म्हटले आहे.
    रावळपिंडी सामन्यात पाकिस्तान आणि इंग्लंड फलंदाजांनी धावांचे डोंगर रचले. या सामन्यात एकूण 1700 हून अधिक धावा झळकल्या. हा सामना अनिर्णित राहिल की काय, असे वाटत असताना इंग्लंडच्या रणनीतीमुळे सामन्याचा निकाल लागला. सामन्याचा निकाल लागला असला तरी रावळपिंडीच्या खेळपट्टीबाबत क्रिकेट जगतातून जोरदार टीका झाली. 
याची दखल आयसीसीनेही घेतली. एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफरीचे अँडी पायक्रॉफ्ट यांनी या खेळपट्टीबाबत निष्कर्ष प्रसिद्ध केला. पायक्रॉफ्ट यांनी रिपोर्टमध्ये म्हटलंय की, रावळपिंडीची खेळपट्टी सुमार दर्जाची आणि सपाट होती. जी कोणत्याही प्रकारच्या गोलंदाजाला उपयुक्त ठरली नाही. त्यामुळे दोन्ही संघांच्या फलंदाजांनी त्यावर वेगवान धावा केल्या. परिणामी आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मी ही खेळपट्टी सरासरीपेक्षा कमी मानतो, अशी टीप्पणी त्यांनी केली. यामुळे पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. 

Related Articles

Back to top button