चीनच्या दूतावासाकडून काँग्रेसने पैसे खाल्ले

अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या चकमकीच्या मुद्द्यांवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये संघर्ष पेटलेला असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर चीनकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. शहांच्या आरोपांमुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शहा म्हणाले की, तवांगमध्ये आठ आणि नऊ डिसेंबरला भारतीय आणि चीनी सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीच्या घटनेमुळं प्रश्नोत्तरांच्या तासाला स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आम्ही यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की या विषयावर संसदेत संरक्षणमंत्री राजनाथसिंह उत्तर देतील. २००५ आणि २००६ साली राजीव गांधी फाऊडेशनला चीनी दूतावासाकडून एक कोटी ३५ लाख रुपयांचा अनुदान मिळाला आहे. या फाऊंडेशनची नोंदणी सामाजिक कार्यांसाठी केलेली आहे, परंतु चीनकडून मिळालेल्या पैशांचा वापर भारत आणि चीन संबंधांसंदर्भातील शोधकार्यांसाठी वापरण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा करत शहांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे.