राजकीय

Gujarat Election : मुस्लिमबहुल मतदारसंघातही भाजपचा डंका

गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजपच्या बाजूने असल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपच्या विजयाची अधिकृत घोषणा होणे बाकी राहिले आहे. आतापर्यंत भाजप १५६ जागेवर आघाडीवर आहे. हिंदूत्त्वाच्या मुद्द्यांवरून निवडणूक लढवणाऱ्या भाजपला गुजरातमध्ये मुस्लिमबहुल मतदारसंघातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. १० पैकी ९ मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा वरचष्मा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये आपला मोर्चा वळवला होता. आपमुळे गुजरातमध्ये तिहेरी लढत झाली. असद्दुदीन ओवैसीच्या AIMIM पक्षानेही गुजरातमध्ये जोर लावला होता. गुजरातमध्ये ९ ते १० टक्के मुस्लीम मतदार आहेत. ३० पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या १५ टक्के आहे. तर, ३० पैकी २० मतदारसंघात २० टक्के मुस्लिम मतदार आहेत. काँग्रेसने यंदा सहा मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.
सुरत पूर्व मतदारसंघात असलम सायकलवाला, वांकानेरमधून मोहम्मद जावेद पीरजादा, अबडासमधून ममदभाई जुंग जत, वागरातून सुलेमान पटेल, दरियापूरमधून ग्यासुद्दीन शेख, जमालपूर खडियामधून इमरान खेडावा यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर, आपने तीन मुस्लिम चेहरे उभे केले होते.
दरियापूरमधून ताज कुरैशी, जंबसूरमधून साजिद रेहान आणि जमालपूर खेडिया येथून हारून नागोरी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, भाजपने एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकिट दिले नव्हते.

Related Articles

Back to top button