हवामान
ब्रेकिंग! सोलापूर हॉट सिटी, आज यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान

- राज्यात एप्रिल महिन्यातच मे सारखी स्थिती जाणवणार आहे. पुढचे चार दिवस हवामानात मोठे बदल होणार असून तापमान 42 ते 45 डिग्रीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि उपनगरात, कोकण पट्ट्यातही वातावरण कोरडे राहणार आहे. पावसाचा किंवा उष्णतेच्या लाटेचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. दरम्यान सोलापुरात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान म्हणजे 43.4 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूरची वाटचाल 44 अंशाच्या दिशेने होत आहे.