राजकीय

फडणवीस यांची ईडीकडून होणार चौकशीचे आदेश

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात न्यायालयाने इडी चौकशीचे आदेश दिले आहेत असे वृत्त (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनाने छापले होते. मात्र, फडणवीसांच्या या बातमीवरून अखेर ठाकरेंच्या सामनाला बॅकफूटवर यावे लागले आहे. याबाबतची माहिती भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
भातखळकर टिवि्टमध्ये म्हणतात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ईडी चौकशीचे आदेश न्यायालयाने दिल्याचे धादांत खोटे वृत्त ‘सामना’ने दिले होते. मी तेव्हाच म्हटले की सामना रंगतदार होणार आहे.
फडणवीस यांनी आपल्या वकिलामार्फत सामनाचे संपादक म्हणजे शूरवीर, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉक्टर आणि दररोज सकाळी गरळ ओकण्याचा विकार असणारे त्यांचे कंपाऊंडर यांना नोटीस पाठवली आणि आज हा खुलासा प्रकाशित झाला. ईडी चौकशीचे न्यायालयाला कुठलेही आदेश नाहीत! चुकीच्या बातमीसाठी माफी तर मागा, असा सल्लाही भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.

Related Articles

Back to top button