क्राईम

इस्टेट हडप करण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचाच काढला काटा

मुंबईतील एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची स्लो पॉयझन देऊन हत्या केली आहे. गारमेंट व्यावसायिक कमलकांत शाह असे मृत पतीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी पत्नी काजल शाह (46) आणि तिचा प्रियकर हितेश जैन (45) यास पोलिसांनी अटक केली आहे. 

पत्नी काजल आणि तिचा प्रियकर हितेशला कमलकांत यांची मालमत्ता हडप करायची होती. यासाठी तिने विमा एजन्सीकडे कमलकांतच्या पॉलिसीबाबत चौकशी केली होती. दरम्यान शाह यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर दोघांना अटक केली आहे. या दोघांनी कमलकांतची हत्या करण्यासाठी अन्नातून थॅलिअम आणि आर्सेनिक हे स्लो पॉयझन दिले.
कमलकांत यांच्या रक्तात आर्सेनिक आणि थॅलिअमचे प्रमाण अधिक आढळले. यामुळे 19 सप्टेंबर रोजी मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे त्यांची आई सरला शहा यांचा 13 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता.
त्यांच्या मृत्यूवेळी त्यांनाही तीच लक्षणे आढळली होती, त्यामुळे हे हत्याकांडाचे प्रकरण असल्याचे दिसते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी के. एस. झंवर यांनी आरोपींना 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

Back to top button